Skip to content


श्री. एकनाथदादा ओंबळे –
जावलीच्या मातीतील खरा हिरा, लोकांच्या मनातील खरा नेता!

IMG-20251005-WA0008.jpg

News By - Sahyadri_News

*सह्याद्री न्युज स्टार ११*
*केळघर /नारायण जाधव*

जावलीची ही माती शौर्याच्या कथा सांगते.अफजलखानासारख्या सैतानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भूमीत गाडलं. या मातीतल्या कणाकणात मावळ्यांच्या बलिदानाची ऊर्जा आहे. शौर्याच्या वारशाबरोबरच ही भूमी समाजकारण, संस्कृती, अध्यात्म आणि शिक्षणाच्या परंपरेसाठीही ओळखली जाते.

या मातीतच जन्माला आलेलं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे – केडंबे गावचे सुपुत्र, शिवसेना सातारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्री. एकनाथदादा ओंबळे.

राजकीय जीवनात वाटचाल करत असताना पहिले समाजकारण नंतर राजकारण या सूत्राचा अवलंब करत शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट  स्व.बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत व एकनिष्ठ सहकारी असलेल्या एकनाथदादा ओंबळे यांनी आपली राजकीय वाटचाल रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले, विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, कामगार नेते आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दिलखुलास आणि मितभाषी

एकनाथदादांचा स्वभाव साधा, सुसंस्कृत, हसतमुख आणि दिलखुलास.पैशाने श्रीमंत होणं ही खरी श्रीमंती नव्हे, तर माणसांशी नातं जोडणं हीच खरी संपत्ती – हे तत्त्व त्यांनी जगून दाखवलं.म्हणूनच ते ज्या माणसांच्या संपर्कात आले, त्या प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत झाले.

राजकारणात समाजकारण

आजकाल राजकारणात माणसांची गर्दी असली, तरी समाजकारणासाठी जगणारे विरळ. एकनाथदादा ही त्यातीलच एक वेगळी ओळख.
निडर, रोखठोक, बिनधास्त पण तरीही संयमी.
शिवसेनेचा झेंडा उंचावताना सातारा जिल्ह्याचे सुपुत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ते महाराष्ट्रात परिचित आहेत. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून तन-मन-धन अर्पण करणारे.
राजकीय पदाचा वापर स्वतःच्या उन्नतीसाठी नव्हे तर समाजाच्या हितासाठी करणारे.


-आरोग्यदूताची ओळख

गेल्या १२ वर्षांत हजारो रुग्णांच्या डोळ्यांत दिलासा निर्माण करणारे आरोग्यदूत.

रुग्णालयांची बिलं कमी करून दिली

मोफत ऑपरेशन्सची सोय केली

मुख्यमंत्री सहाय्यता निधीपर्यंत लोकांना पोचवलं


आजवर करोडो रुपयांचं ओझं त्यांनी गरीबांच्या खांद्यावरून हलकं केलं.
पण या कार्याचा कधीही गाजावाजा नाही –
“जे केले ते निस्वार्थपणे” हाच त्यांचा स्वभाव.

लोकनेते, समाजनेते

समस्या कोणत्याही प्रकारची असो –
हॉस्पिटलची, पोलिसांची, मंत्रालयाची किंवा घरगुती –
दादांचा फोन सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत खणखणतो.
कारण लोकांना खात्री असते – “हा माणूस आपलं काम करून देईल.”

पक्ष, जात, धर्म या चौकटीत न बसता
माणुसकीचाच धर्म मानणारे.
म्हणूनच विरोधकही त्यांचे चाहते झाले आहेत.


भावी वाटचाल

पक्षासाठी ३२ वर्षे दिलेलं निस्वार्थ योगदान आणि समाजासाठी उभारलेलं अमूल्य मनुष्यधन यामुळे
एकनाथदादांना शासनात मानाचे पद मिळावे, ही जावलीकरांची सामूहिक इच्छा आहे.

प्रशांत जुनघरे
निष्ठावंत शिवसैनिक

बातमी शेयर करा :

Scroll To Top