Skip to content

केळघर आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचा ठिय्या , सर्पदंशाने चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू . वैद्यकिय अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप ..

IMG-20250927-WA0002.jpg

News By - Sahyadri_News

*सहयाद्री न्युज स्टार ११*
* केळघर / नारायण जाधव .
         केळघर ता . जावली येथील श्रीशा मिलिंद घाडगे या चार वर्षाच्या मुलीचा  गुरुवारी सर्पदंश झाल्याने दुर्दैवी  मृत्यू झाला होता.या मुलीचा मृत्यू  वेळेत उपचार न झाल्याने व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा आरोप करून  येथील व परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांनी आज प्राथमिक आरोग्य केंद्र केळघर येथे काही वेळ ठिय्या आंदोलन करून या प्रकरणी जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे निवेदन तालुका आरोग्य आधिकारी जावळी यांना आज दिले.

निवेदनातील अधिक माहिती अशी ,येथील चार वर्षांची मुलगी श्रीशा मिलिंद घाडगे हिला गुरुवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात आई जेवण भरवत असताना सर्पदंश झाला होता. त्यावेळी आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र योग्य निदान व योग्य उपचार न झाल्याने रुग्णाची अवस्था गंभीर झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दवाखान्यात दोन रुग्णवाहिका असून देखील उपलब्ध न झाल्याने खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात हलवावे लागले परंतु  उपचारापूर्वीच तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे श्रीशाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्ष तपासणी न करता औषधोपचार करतात असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.गंभीर आजारी रुग्णांना रुग्णवाहिका वेळेत मिळत नसल्याने रुग्णांना पुढील  उपचार वेळेत मिळत नाहीत .आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत.या आरोग्य केंद्रात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने रुग्णांना दर्जेदार सेवा मिळत नाही. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराबद्दल ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात काही काळ ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात उपसरपंच शंकर बेलोशे, सागर पार्टे, बाजीराव धनावडे, जगन्नाथ पार्टे, यशवंत बेलोशे, सतीश पार्टे, सुनील बेलोशे, बाजीराव पार्टे, दत्ता बेलोशे ,प्रीतम पार्टे, शैलेश पार्टे, स्वप्नील पाटील ,प्रशांत बेलोशे, संदीप बेलोशे, अक्षय बेलोशे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.   शेवटी संध्याकाळी  उशिरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव हे प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यावर त्यांना  ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले. यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यादव यांनी झालेल्या घटनेची सविस्तर चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेस सादर करणार असल्याचे सांगितले.
फोटो :केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलन करताना केळघर  ग्रामस्थ.
सोबत श्रीशा चा identi फोटो

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

जावली तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे मार्गी लावली आहेत . तरीही विरोधी उमेदवाराला विकास दिसत नाही – आ शिवेंद्रसिहराजे भोसले .
केळघर येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन
विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मेढा पोलीस ठाणे हद्दीतील मेढा बाजारपेठ , कुडाळ बाजारपेठ व करहर बाजारपेठेत रूट मार्च
उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मेढा पोलीस स्टेशनचा सन्मान ..
जावली तालुका मंडलाधिकारी व तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री संदिप ढाकणे यांची निवड ..
अमितदादांच्या मुळे राष्ट्रवादीत बेरजेचे राजकारण…-सुरेश पार्टे..
विकास सेवा सोसायट्यांनी उत्पन्न वाढीचे प्रयत्न करावेत आ शिवेंद्रसिंहराजे भोसले .
सातारा- जावलीतील २२ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ४.४० कोटी
आईच्या स्मृतिदिनी जि.प. शाळांना स्मार्ट टिव्ही
आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन नांदगणे पुनवडी पुलासाठी ५ कोटींहुन अधिक निधी मिळाला असुन पुलाचे काम अंतिम टप्यात आहे
Scroll To Top