Skip to content

कै .पांडुरंग महादेव पार्टे (भाऊ ) यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी (श प ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे व मा . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाहिली आदरांजली .

IMG-20250824-WA0002.jpg

News By - Sahyadri_News


केळघर /नारायण जाधव .
जावली तालुक्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात स्वर्गीय पांडुरंग पार्टे ( भाऊ ) अतिशय चांगले काम केले असुन त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांनी ही सामाजिक बांधिलकाची परंपरा कायमच जपली आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले .
   केळघर विभागाचे आधारवाड म्हणुन सर्व परिचित असणाऱ्या स्वर्गीग पांडुरंग पार्टे ( भाऊ ) यांचे १२ वे  पुण्यस्मरण दरवर्षीप्रमाणे पार्टे कुटुंबियांचे वतीने आयोजण करण्यात आले होते .
  यावेळी संपूर्ण जावली तालुक्या सह संपूर्ण सातारा जिल्हयातुन भाऊंवर प्रेम करणारे सामाजीक , शैक्षणिक व राजकिय क्षेत्रातील मान्यवरांची सकाळपासुनच आदरांजली वाहण्यासाठी अलोट गर्दी होती .
  यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे , मा . प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील यांनी सुदधा स्वर्गींच भाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार वाहुन भावपुर्ण श्रद्धांजली आर्पण केली .
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांनी भ्रमण ध्वनी वरून पार्टे कुटुंबियांशी संवाद साधला .
  यावेळी संपूर्ण पार्टे कुटुंबियांसह   जावलीचे मा .सभापती श्री बापुराव पार्टे , दत्तात्रय पार्टे ‘सचिनशेठ पार्टे, प्रमोद पार्टे, विनोद पार्टे, सुधिर पार्टे ‘ सतिष पार्टे , यांचे सह बाजीराव धनावडे , सागर पार्टे, दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते . उपस्थितांचे आभार सचिन पार्टे यांनी मानले .
फोटो : पांडुरंग पार्टे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना शशिकांत शिंदे समवेत जयंत पाटील , बापुराव पार्टे , दत्तात्रय पार्टे , प्रमोद पार्टे , सचिन पार्टे व पार्टे कुटुंबिय .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे साताऱ्यात जोरदार स्वागत … सातारकरांशी साधला संवाद ..
महायुतीच्या विजयाची जबाबदारी भाजप घेणार .. बावनकुळे … साताऱ्यासह ४५ जागा निवडुन आणणार .. पालकमंत्री बदल ठरल्याप्रमाणेच ..
अभ्यास , छंद , खेळ या त्रिसुत्रीची सांगड घातली की यशस्वी होता येते .. ओमकार पवार . निझरेतील गणेश विकास मंडळाकडुन शिक्षक व गणवंतांचा सत्कार ..
बोंडारवाडी प्रकल्पासह कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनास मान्यता .. आ . शिवेंद्रसिहराजेंच्या पाठपुराव्याला यश .. १ टी . एम . सी . बोंडारवाडी प्रकल्पावर शिक्कामोर्तब …
महात्मा गांधी जयंती निमित्त जावली तालुक्यातील सावली गावात स्वच्छतेचा जागर .. लहान मुलांसह ग्रामस्थांनी स्वच्छ केला गाव व परिसर ..
केळघरचे सुपुत्र युवा उद्योजक समाजसेवक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ) उत्कृष्ठ समाजसेवक पुरस्काराने सन्मानित ..
सभासद – शेतकयांच्या सहकार्यामुळेच ‘ अजिंक्यतारा ‘ ची घोडदौड आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले .. कारखान्याची ४१ वी वार्षिक सभा उत्साहात सपन्न …
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर ..
इस्त्रायल शास्त्रज्ञ मिखाल याकीर यांची कास पठारला भेट ..
गोदवलेच्या राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवात ‘ पौर्णिमा प्रथमः इम्रान मोमीन सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक, सोनाली ओंबळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वैष्णवी जाधव सर्वोत्कृष्ठ बालकलाकार तर निलेश गुरव सर्वोत्कृष्ठ ..
Scroll To Top