Skip to content

स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ .. डोंगरात १५०० देशी झाडांची लागवड .

IMG-20250814-WA0005.jpg

News By - Sahyadri_News

सहयाद्री न्युज स्टार ११
केळघर /नारायण जाधव .
स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ सुरू झाली असून आज या लोकचळवळीत लोकसहभागातून ग्रामस्थ , महिला ,
,विद्यार्थी व वृक्षप्रेमी तसेच लायन्स क्लब सातारा यांच्या वतीने १५०० देशी झाडांची डोंगररानात वृक्षलागवड करण्यात आली .
गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांनी प्रथम वृक्षारोपन करून या मोहीमेचा शुभारंभ करून शेकडो हातांनी आज १५०० देशी झाडांची लागवड करण्यात आली .
यावेळी सरपंच विजय सपकाळ, जिल्हा परिषचे तज्ञ समन्वयक अजय राऊत , लायन्स क्लब साताराचे अध्यक्ष ॲड मंगेश महामुलकर, खजिनदार डॉ संतोष ढोणसे विस्तार अधिकारी ए . पी .पवेकर, शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ दळवी, केंद्रप्रमुख बळवंत पाडळे, शाखा अभियंता आकाश मस्कर,ग्रामपंचायत अधिकारी वैभव निकम , सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश मोरे,मराठी शाळेचे मुख्याध्यापक दिपक भोसले, माध्यमिकचे मुख्याध्यापक के सी गाढवे , मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर, ग्रामपंचायत सदस्य आनंदा जुनघरे, सुरेश कांबळे, आनंदी जुनघरे, वनिता म्हस्कर, निर्मला जुनघरे, मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब रूपवणकर ,
पोलिस पाटील संजय कांबळे आदी उपस्थित होते .
प्रारंभी संपूर्ण गावातून वृक्षदिंडी ढोल ताशांच्या गजरात व झाडे लावा झाडे जगवा घोषणांच्या जयघोषात काढण्यात आली .
यानंतर
डोंगररान परिसरात एक हजर ५०० देशी झाडांची लागवड करण्यात आली .


या हरितक्रांती मोहिमेत ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी ,ग्रामस्थ मंडळ , अजिंक्य नेहरू युवा मंडळ ,सर्व सदस्य, महिला मंडळ , लायन्स क्लब सातारा ,क्रांती विद्यालय, जिल्हा परिषद प्राथ केंद्र शाळा सावली, अंगणवाडी, तसेच कर्मचारी, तसेच पंचक्रोशीतील वृक्षप्रेमी ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग होता .
गावामध्ये “वृक्ष चळवळ ही लोक चळवळ” सुरू झाली असून प्रत्येक कुटुंबाला संवर्धन करण्यासाठी एका पेक्षा अधिक झाडे दत्तक देण्यात येणार आहेत . त्याची शंभर टक्के जोपासना करण्याची जबाबदारी त्या कुटुंबाची राहणार असल्याचे यावेळी ग्रामपंचायत अधिकारी वैभव निकम यांनी सांगीतले .

डॉ निलेश पाटील
गटविकास अधिकारी पं स जावळी
क्लीन आणि ग्रीन सावली खरोखरच स्मार्ट ग्राम कडून हरित ग्राम करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून सर्वच गावांना आदर्शवत आहे . उपक्रमशील सावलीला सर्वोतपरी सहकार्य देणार .

सरपंच विजय बा .सपकाळ यांनी सांगीतले, की
“आज लावलेले हे देशी झाड उद्या आपल्या पिढ्यांसाठी थंड सावली, स्वच्छ हवा आणि निरोगी जीवन देणार आहे .
त्यामुळे आपण एकत्र हरित सावली निर्माण करू या.”


लायन्स क्लब सातारचे दिलीप वहाळकर,म्हणाले या उपक्रमामुळे सावली गाव केवळ स्मार्ट ग्रामच नव्हे तर हरित ग्राम म्हणूनही ओळखले जाईल . येथील सरपंच त्यांचे सहकारी ग्रामस्थ यांची एकजूट वाखाण्याजोगे असून सर्वांना आदर्शवत आहे .
पोलिस पाटील संजय कांबळे यांनी आभार मानले .
यावेळी माजी सरपंच दुयोधन जुनघरे, ग्राम महसुल अधिकारी बाळासाहेब कर्चे, कृषी सहायक विलास कदम, प्रा के ए पठाण, आर डी जंगम , दीघे गुरुजी, अकुंश सपकाळ, लायन्स वलबचे खजिनदार ॲड संतोष ढोमसे
दिलीप वहाळकर , श्रीकांत भोईटे, सुनील हेंद्रे, अमोल तावरे, प्रशांत जाधव, प्रकाश जुनघरे तानाजी केमदारणे आदी उपस्थित होते.

फोटो : सावली : येथे महाश्रमदानातून वृक्षलागवड करताना डॉ निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी व वृक्ष प्रेमी
आदी

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील : डॉ . भीमराव आंबेडकर ..
सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील डॉ . भीमराव आंबेडकर ..
यशवंत कारंजकर यांचे दुखःद निधन .
नांदगणे गावच्या विकासासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशिल असुन भविष्यातही येथील विकास कामे आ . शिवहरसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन होतील .. युवा उद्योजक सागर धनावडे .
समाजसेवक श्री ज्ञानदेव रांजणे (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ..
मेढा महावितरण कडुन भणंग गावात एक गाव एक दिवस उपक्रम ..
बोंडारवाडी धरणासाठी महिलाचा एल्गार ….
ग्राम सुरक्षा यंत्रनेमुळे तात्काळ मदत मिळणार .. डि .के. गोर्डे .
आपलेच जिवलग मित्र समुहाने जपली सामुहिक बांधिलकी .. फेसबुकवरील मित्रांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ..
जावली तालुका पत्रकार संघ जावलीचे कार्याध्यक्ष सादिक सय्यद यांना लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा . भिलारे गुरुजी जन्मशताब्दी पुरस्कार जाहिर ..
Scroll To Top