Skip to content

अमितदादांच्या मुळे राष्ट्रवादीत बेरजेचे राजकारण…-सुरेश पार्टे..

IMG-20240926-WA0040

News By - Sahyadri_News

*सहयाद्री न्युज स्टार ११*

मेढा / प्रतिनिधी

अमितदादा कदम यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जावळी -सातारा विधानसभा मतदार संघामध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बेरजेचे राजकारण होईल.. तसेच पक्षाची दुभंगलेली फळी एक होण्यास नक्कीच मदत होईल . असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे सातारा – जावली विधानसभा अध्यक्ष – सुरेश पार्टे यांनी व्यक्त केला. सुरेश पार्टे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे अमितदादा कदम यांच्या निर्णयाचे स्वागतच केले आहे. आगामी विधानसभेचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा गट ) जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब हे सातारा दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष भेट घेवून आपण सातारा – जावली विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढ०यास इच्छूक असून आपणास आपल्या पक्षातून अदवारी द्यावी अशी मागणी त्यांच्या निकटवर्तीयांच्या समवेत केली आहे . उमेदवारीचा जो काही निर्णय असेल तो पक्षश्रेष्ठी घेतील मात्र अमितदादा कदम यांनी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षातून उमेदवारी लढविण्याची व्यक्त केलेल्या इच्छेमुळे मतदार संघामध्ये परिवर्तनाचे वारे सुरु झाले आहे. राज्यात अनेक नेत्यांची पुढचं भविष्य ओळखून पवार साहेबांना साथ देण्यासाठी , तुतारी हातात घेण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. जावली तालुक्याचे सुपुत्र माजी जलसंपदामंत्री आ. शशिकांतजी शिंदे यांचीही अमितदादा कदम यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून सविस्तर चर्चा करत आपली इच्छा व्यक्त केली. अमितदादा कदम हे स्व. आमदार जी. जी. कदम ( आण्णा ) यांचे सुपुत्र असून त्यांना लहानपणापासुनच राजकारणाचे बाळकडू मिळालेले आहे. महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापती , जि.प. शिक्षण व अर्थ समितीचे सभापती पद भुषविले असल्याने प्रशासनावर त्यांची चांगली पक्कड आहे. त्यांचा जनसंपर्क व कार्यकत्यांची फळी चांगली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदार संघातील अनेक प्रश्न,विकास कामे मार्गी लावली आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादी फुटली तेव्हा ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी सलोख्याचे संबध असल्याने त्यांच्याबरोबर गेले होते. त्यामुळे विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी पक्षात व कार्यकत्यांचे मध्ये दुफळी निर्माण झाली. अमितदादांच्या निर्णयामुळे पक्षातील ही दुफळी नक्कीच कमी होईल . विभागलेले कार्यकर्तें एक होतील आणि पक्षाची ताकद नक्कीच पुन्हा वाढेल. मतदार संघामध्ये आजही आ . शशिकांतजी शिंदे यांचे पक्षीय वर्चस्व असून राष्ट्रवादीचे नेते दिपक पवार ,यांचे बरोबर अमित कदम यांचेमुळे राष्ट्रवादीची ताकद एकसंघ होणार आहे. तालुक्यातील नेते तसेच आजी, माझी पदाधिकारी यांच्या एकीच्या जोरावर भविष्यातील सर्व निवडणूका शक्य त्या ठिकाणी आघाडी धर्म पाळून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सक्षमपणे लढवेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जावली विधानसभा अध्यक्ष सुरेश पार्टे यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेयर करा :

Scroll To Top