Skip to content

सातारा- जावलीतील २२ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ४.४० कोटी

IMG-20240912-WA0015

News By - Sahyadri_News

आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेतून मिळवला निधी

सातारा / नारायण जाधव .

सातारा आणि जावली मतदारसंघातील २२ गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून ४ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ‘मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणे’ या योजनेतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सातारा तालुक्यातील वेणेखोल, बेंडवाडी, मोरेवाडी, निगुडमाळ, पिलाणी, मस्करवाडी, वावदरे, राकुसलेवाडी, आरगडवाडी, बोपोशी, चाळकेवाडी, साबळेवाडी आणि पेट्री- अनावळे या १३ ग्रामपंचायतींच्या नवीन कार्यालय बांधकामासाठी प्रत्येकी २० लाख म्हणजेच एकूण २ कोटी ६० लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जावली तालुक्यातील कुंभारगणी, पानस, म्हाते बु., केसकरवाडी, वरोशी, बामणोली कसबे, मोहाट, मरडमुरे आणि नांदगणे या ९ ग्रामपंचायतींच्या नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी प्रत्येकी २० लाख असा एकूण १ कोटी ८० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून इमारत बांधकाम करण्याची मंजूर कामे तात्काळ सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील : डॉ . भीमराव आंबेडकर ..
सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील डॉ . भीमराव आंबेडकर ..
यशवंत कारंजकर यांचे दुखःद निधन .
नांदगणे गावच्या विकासासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशिल असुन भविष्यातही येथील विकास कामे आ . शिवहरसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन होतील .. युवा उद्योजक सागर धनावडे .
समाजसेवक श्री ज्ञानदेव रांजणे (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ..
मेढा महावितरण कडुन भणंग गावात एक गाव एक दिवस उपक्रम ..
बोंडारवाडी धरणासाठी महिलाचा एल्गार ….
ग्राम सुरक्षा यंत्रनेमुळे तात्काळ मदत मिळणार .. डि .के. गोर्डे .
आपलेच जिवलग मित्र समुहाने जपली सामुहिक बांधिलकी .. फेसबुकवरील मित्रांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ..
जावली तालुका पत्रकार संघ जावलीचे कार्याध्यक्ष सादिक सय्यद यांना लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा . भिलारे गुरुजी जन्मशताब्दी पुरस्कार जाहिर ..
Scroll To Top