Skip to content

आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन नांदगणे पुनवडी पुलासाठी ५ कोटींहुन अधिक निधी मिळाला असुन पुलाचे काम अंतिम टप्यात आहे

IMG-20240803-WA0011

News By - Sahyadri_News

शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातुन कोट्यावधींचा विकासनिधी मिळत आहे त्यामुळेच विरोधकांना पोटशुळ उठला आहे. यापुढे विरोधकांनी बिनबुडाचे आरोप केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल .. सामाजीक कार्यकर्ते सागर धनावडे व कार्यकत्यांनी घेतला विरोधकांचा खरपुस समाचार .

*सहयाद्री न्युज स्टार ११*

केळघर / नारायण जाधव .. नांदगणे-पुनवडी पुलाच्या बांधकामासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाच कोटी हून अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून अतिवृष्टीमुळे पुलाच्या रस्त्याचे व भरावाचे काम प्रलंबित आहे. पाऊस कमी झाल्यानंतर हेही काम तातडीने पूर्ण होईल. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून जावळी तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागत असताना विरोधकांच्या नेमके काय पोटात दुखत आहे. स्वतःचे सरकार असताना एकही रुपयाचा निधी जावळीच्या विकासासाठी आणता आला नाही त्यांनी जावळीच्या जनतेची काळजी करू नये.

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या विकासकामां बद्दल बोलण्याची विरोधकांची उंची नसून विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करून जावळीच्या जनतेत संभ्रम निर्माण करू नये अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असा सामाजिक कार्यकर्ते सागर धनावडे, पुनवडीचे सरपंच सुरेश पार्टे, बंडोपंत ओंबळे, सचिन पार्टे, श्रीरंग पाडळे यांच्यासह नांदगणे, पुनवडी ,केडंबे परिसरातील ग्रामस्थांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

पत्रकातील अधिक माहिती अशी की २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुनवडी पुलाचा भराव वाहून गेला होता .आणि हा रस्ता बंद झाला होता. यावेळी तात्काळ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे भेट देऊन तात्पुरती वाहतूक सुरू करण्याची सूचना केली होती. जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी स्वखर्चाने भराव टाकून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला होता. याचवेळी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडून प्रथम दोन कोटी निधी मंजूर करून आणला होता. त्यावेळी सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी पुढे पुढे करणारे ठाकरे गटाचे पदाधिकारी नेमके कुठे होते असा सवाल विचारण्यात आला आहे. कुठल्याही प्रश्नांची माहिती न घेता सवंग लोकप्रियता व केवळ प्रसिद्धीसाठी जावळी तालुक्यात यायचे व विकासकामे करणाऱ्या लोकप्रतिनिधी वर बिनबुडाचे आरोप करण्याचा नवा व्यवसाय ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. तुम्हाला एवढा जावळी तालुक्याच्या जनतेचा कळवळा होता मग तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री असताना तुम्ही जावळी तालुक्याच्या विकासासाठी किती निधी आणला याचीही माहिती तालुक्यातील जनतेला द्यावी. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या गावात सर्वाधिक विकासकामे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मार्गी लावली असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतीनिधीनी एवढी विकासकामे केली नाहीत त्यापेक्षा जास्त विकासकामे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळी तालुक्यात कामे केली आहेत.

विरोधकांना नेमका कशाचा पोटशूळ आहे याची माहिती असून सरकार कुणाचेही असुदे त आमदार शिवेंद्रसिंहराजे सर्वाधिक विकासकामे मार्गी लावतात याची माहिती विरोधकांनी घ्यावी. जावळी तालुक्यातील विकासकामाबद्द्ल विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न यापुढे विरोधकांनी केल्यास त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशारा सागर धनावडे, यांच्यासह आमदार शिवेंद्रसिंहराजे समर्थकांनी दिला आहे.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आ . शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना कॅबिनेट मंत्रीपद देवुन छत्रपत्रींच्या गादीचा सन्मान व्हावा – ज्ञानदेव रांजणे .
जावली तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे मार्गी लावली आहेत . तरीही विरोधी उमेदवाराला विकास दिसत नाही – आ शिवेंद्रसिहराजे भोसले .
केळघर येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन
विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मेढा पोलीस ठाणे हद्दीतील मेढा बाजारपेठ , कुडाळ बाजारपेठ व करहर बाजारपेठेत रूट मार्च
उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मेढा पोलीस स्टेशनचा सन्मान ..
जावली तालुका मंडलाधिकारी व तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री संदिप ढाकणे यांची निवड ..
अमितदादांच्या मुळे राष्ट्रवादीत बेरजेचे राजकारण…-सुरेश पार्टे..
विकास सेवा सोसायट्यांनी उत्पन्न वाढीचे प्रयत्न करावेत आ शिवेंद्रसिंहराजे भोसले .
सातारा- जावलीतील २२ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ४.४० कोटी
आईच्या स्मृतिदिनी जि.प. शाळांना स्मार्ट टिव्ही
Scroll To Top