केळघर परिसरासह घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग , वेण्णा नदी पात्र दुथडी भरुण वाहत आहे

News By - Sahyadri_News
केळघर / नारायण जाधव .
केळघरसह परिसरात व घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरी कोसळत असुन परिसरातील ओढे , नाले दुथडी भरुण वाहत आहेत तर वेण्णा नदीपात्राने धोक्याची पातळी ओलंडली असुन वेण्णा नदीला पुराचे स्वरूप आले आहे . नदीकाठच्या भातशेतीत नदीचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन नदीकाठच्या शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे .

आंबेघर तर्फ मेढा येथील स्मशान भुमीत पाणी शिरले असुन केळघर – डांगरेघर दरम्यानच्या रस्त्या कडेची दरड कोसळल्याने सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे .
केळघर येथील वेण्णा नदीपात्रालगतचा घाट पाण्याखाली गेला आहे .

केळघर परिसरात पावसाचे प्रमाण आजुन दोन दिवस असेच राहिल्यास परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे .
फोटो १ ) आंबेघर तर्फ मेढा येथील स्मशानभुमिला वेण्णा नदीपात्राने मारलेला वेढा .
२ ) वेण्णा नदीने धोक्याची पातळी ओलंडली असून वेण्णा नदी दुथडी भरुण वाहत आहे . (छाया : नारायण जाधव )









