Skip to content

श्री भैरवनाथ विद्या मंदिर केळघरचे शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश . .

IMG-20240211-WA0214

News By - Narayan Jadhav

श्री भैरवनाथ विद्या मंदिर केळघरचे शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश .
*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव .
केळघर ता .जावलीयेथील श्री भैरवनाथ विद्या मंदिर केळघर ने शासकीय रेखाकला परीक्षेत आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा शासकीय एलिमेंटरी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून इंटमिजीएट परीक्षेचा ९९ टक्के निकाल लागला आहे. मुख्याध्यापक सतीश जगदाळे यांनी कलाशिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शासकीय रेखाकला एलिमेंटरी परीक्षेत ५५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून तीन विद्यार्थ्यांना ए ग्रेड, ६ विदयार्थ्यांना बी ग्रेड तर ४६ विद्यार्थ्यांना सी ग्रेड मिळाला आहे. त्यासोबतच इंटर मिजियट परीक्षा साठी विद्यालयाचे ९९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी ९ ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पैकी १० विद्यार्थी ए ग्रेड, २८ विद्यार्थी बी ग्रेड तर ६० विद्यार्थी सी ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. याप्रसंगी केंद्रप्रमुख हंबीरराव जगताप मुख्याध्यापक जगदाळे एस. जे., स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती , विद्यालयाचे हितचिंतक , सर्व संचालक मंडळ, व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक कलाशिक्षक विजय पडवळ यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आ . शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना कॅबिनेट मंत्रीपद देवुन छत्रपत्रींच्या गादीचा सन्मान व्हावा – ज्ञानदेव रांजणे .
जावली तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे मार्गी लावली आहेत . तरीही विरोधी उमेदवाराला विकास दिसत नाही – आ शिवेंद्रसिहराजे भोसले .
केळघर येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन
विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मेढा पोलीस ठाणे हद्दीतील मेढा बाजारपेठ , कुडाळ बाजारपेठ व करहर बाजारपेठेत रूट मार्च
उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मेढा पोलीस स्टेशनचा सन्मान ..
जावली तालुका मंडलाधिकारी व तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री संदिप ढाकणे यांची निवड ..
अमितदादांच्या मुळे राष्ट्रवादीत बेरजेचे राजकारण…-सुरेश पार्टे..
विकास सेवा सोसायट्यांनी उत्पन्न वाढीचे प्रयत्न करावेत आ शिवेंद्रसिंहराजे भोसले .
सातारा- जावलीतील २२ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ४.४० कोटी
आईच्या स्मृतिदिनी जि.प. शाळांना स्मार्ट टिव्ही
Scroll To Top