Skip to content

सातारा जिल्ह्यातील मतदार शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहतील .. डॉ . सतिश बाबर …

IMG-20231022-WA0130

News By - Narayan Jadhav

सातारा जिल्ह्यातील मतदार शरद पवारांच्या पाठीशी उभे राहतील – डॉ. सतीश बाबर
*सह्याद्री न्युज स्टार ११*
बावधन प्रतिनिधी / दिलिप कांबळे .राष्ट्रवादी अध्यक्ष राष्ट्रीय नेते शरद पवार सारख्या महाराष्ट्राच्या कणखर नेत्याला खच्ची करण्याचा राष्ट्रवादी संपवण्याचा डाव सामान्य मतदार राजा उधळून लावणार असून सामान्य मतदार कामगार कष्टकरी श्रमिक गोरगरीब पददलित दिन दुबळा शेतकरी नोकरदार निष्ठावंत सुशिक्षित वर्ग अशा सर्व स्तरातील मतदार शरद पवारांच्या पाठीशी उभी राहतील असा विश्वास आस्था मित्र परिवाराचे प्रमुख राष्ट्रवादी पक्षाचे प्रादेशिक सदस्य डॉक्टर सतीश बाबर यांनी व्यक्त केलं मुंबई येथील येथील राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा मतदार संघ मतदार आढावा बैठक आयोजित कार्यक्रमात डॉक्टर सतीश बाबर यांनी विचार मांडले ते म्हणाले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा राजकीय सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवणारे शरद पवार हे एकमेव नेते आहेत सातारा जिल्हा त्यांच्या हक्काचा बालेकिल्ला आहे त्याचा बुरुज आम्ही ढासळू देणार नाही आमचे नेते पवार साहेब खचलेले नसून खंबीरपणे लढा देणारे आमचे दैवत आहे असे डॉक्टर बाबर म्हणाले शरद पवार म्हणाले मी खंबीरपणे संघर्ष करणार मागे हटणार नाही तुमची साथ मोलाची असल्याचे त्यांनी सांगितले गेलेल्यांसाठी परतीचे दोर कापले असून केवळ लढणे जिंकणे हे आपले ध्येय आहे कार्यकर्ते यांनी आपापल्या मतदार संघात भागात गावागावात तळागाळात जोमाने व निष्ठेने काम चालू ठेवा मागे हटू नका दबावाला बळी पडू नका मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे असा निकरीचा आदेश शरद पवार नी दिल्याने कार्यकर्ते यांचे मनोबल वाढले आहे डॉक्टर सतीश बाबर यांच्याबरोबर उपसभापती अनिल जगताप ॲड.निलेश डेरे डॉ .नितीन सावंत उपस्थित होते

बातमी शेयर करा :

Scroll To Top