अभ्यास , छंद , खेळ या त्रिसुत्रीची सांगड घातली की यशस्वी होता येते .. ओमकार पवार . निझरेतील गणेश विकास मंडळाकडुन शिक्षक व गणवंतांचा सत्कार ..

News By - Narayan Jadhav
अभ्यास, छंद, खेळ या त्रिसूत्रीची सांगड घातली की यशस्वी होता येते. — ओमकार पवार
निझरेतील गणेश विकास मंडळाकडून शिक्षक व गुणवंतांचा सत्कार…
*सहयाद्री न्युज स्टार ११*
मेढा प्रतिनिधी .
अभ्यास, छंद, खेळ या त्रिसूत्रीची सांगड घातली तर जीवनात यशस्वी होता येते. तसेच ध्येयाने प्रेरित झाल्यास उच्चपदस्थ अधिकारी होता येते असे मत जावली तालुक्यातील पहिले आय.ए.एस अधिकारी ओमकार पवार यांनी व्यक्त केले आहे. निझरे ता. जावली येथील गणेश विकास मंडळाकडून पार पडलेल्या गावातील शिक्षक व तालुक्यातील उच्चपदस्थ अधिकारी यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमपीएससी परीक्षेत उत्तम पद्धतीने यश मिळविले शेखर भिलारे, नुकत्याच कृषी अधिकारी झालेल्या सायली शेलार या उपस्थित होत्या.

निझरे ता. जावली येथील गणेश विकास मंडळाकडून गणेशोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती, गावातील आजी- माजी शिक्षक तसेच जावली तालुक्यातील उच्चपदावर यश मिळविलेल्या अधिकारी यांचा सन्मान सोहळा गणेश मंडळाकडून यावर्षी आयोजित करण्यात आला होता. यावेळी जावली तालुक्यातील पहिले आय.ए.एस अधिकारी ओमकार पवार, एमपीएससी परीक्षेत उज्वल यश मिळविलेले शेखर भिलारे, कृषी अधिकारी पदी निवड झालेल्या सायली शेलार यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.

यावेळी शेखर भिलारे यांनी कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व तरुणांना स्पर्धा परीक्षेची आव्हाने व स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले. तर स्पर्धा परीक्षेतील नोकरीच्या संधी व मुलींचा ध्येयवादी दृष्टिकोन याबाबत सायली शेलार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष संतोष बामणे यांनी केले तर सरपंच सतीश भिलारे, गणेश शेडगे यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पवार यांनी केले. तर आभार किरण शेलाटकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश विकास मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले. या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी तसेच मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

