Skip to content

बोंडारवाडी प्रकल्पासह कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनास मान्यता .. आ . शिवेंद्रसिहराजेंच्या पाठपुराव्याला यश .. १ टी . एम . सी . बोंडारवाडी प्रकल्पावर शिक्कामोर्तब …

FB_IMG_1696239352395

News By - Narayan Jadhav

बोंडारवाडी प्रकल्पासह कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनास मान्यता
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; १ टी.एम.सी. बोंडारवाडी प्रकल्पावर शिक्कामोर्तब ..
*सहयाद्री न्युज स्टार ११*
सातारा / प्रतिनिधी
जावली तालुक्यातील ५४ गावांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागावा, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. १ टी.एम.सी.चे बोंडारवाडी धरण बांधण्यासाठी कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनास राज्याच्या जलसंपदा विभागाने मान्यता दिली असून १ टी.एम.सी.चा बोंडारवाडी प्रकल्प उभारण्यासाठी शासकीय शिक्कामोर्तब झाले आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या अभ्यासपूर्ण आणि सातत्याने सुरु असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून बोंडारवाडी धरण प्रकल्पाची जागा निश्चित करून प्राथमिक सर्वेक्षण आणि भूस्तर वर्गीकरणाची विंधन विवरे (ट्रायल बोअर) घेण्याच्या कामासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सर्वेक्षण ठोक तरतुदींमधून निधी उपलब्ध करून देण्यास आला आहे. दरम्यान, मेढा पश्चिम भाग आणि केळघर भागातील ५४ गावांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बोंडारवाडी धरण १ टी.एम.सी.चे व्हावे, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची होती. त्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार लवादाने कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनास मान्यता दिल्याने ५४ गावांच्या सिंचनाचा प्रश्न निकाली निघणार आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार बोंडारवाडी प्रकल्पासह कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनास मान्यता मिळण्यासाठी जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला जलसंपदा विभागाचे अवर सचिव संदीप भालेराव यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. सुधारित जलनियोजनामुळे ०.२०० एम.सी.एफ.टी. क्षमतेऐवजी बोंडारवाडी धरण आता १ टी.एम.सी. क्षमतेचे होणार आहे. त्यामुळे ५४ गावांचा सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. या निर्णयामुळे ५४ गावातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानले आहेत.
प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाला प्राधान्य
१ टी.एम.सी.च्या बोंडारवाडी प्रकल्पाला मान्यता मिळाल्याने आ. शिवेंद्रसिंराजेंनी मुख्यमंत्री ना. शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, धरण प्रकल्प मार्गी लावताना येथील प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन तातडीने केले जाईल. बाधितांच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी लागेल तेवढा निधी देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालून शासनाकडून योग्य प्रकारे हा प्रश्न सोडवू. त्यामुळे कोणीही चिंता करू नये, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बोंडारवाडी ग्रामस्थ आणि समस्त जावलीकरांना केले आहे.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आ . शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना कॅबिनेट मंत्रीपद देवुन छत्रपत्रींच्या गादीचा सन्मान व्हावा – ज्ञानदेव रांजणे .
जावली तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे मार्गी लावली आहेत . तरीही विरोधी उमेदवाराला विकास दिसत नाही – आ शिवेंद्रसिहराजे भोसले .
केळघर येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन
विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मेढा पोलीस ठाणे हद्दीतील मेढा बाजारपेठ , कुडाळ बाजारपेठ व करहर बाजारपेठेत रूट मार्च
उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मेढा पोलीस स्टेशनचा सन्मान ..
जावली तालुका मंडलाधिकारी व तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री संदिप ढाकणे यांची निवड ..
अमितदादांच्या मुळे राष्ट्रवादीत बेरजेचे राजकारण…-सुरेश पार्टे..
विकास सेवा सोसायट्यांनी उत्पन्न वाढीचे प्रयत्न करावेत आ शिवेंद्रसिंहराजे भोसले .
सातारा- जावलीतील २२ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ४.४० कोटी
आईच्या स्मृतिदिनी जि.प. शाळांना स्मार्ट टिव्ही
Scroll To Top