Skip to content

सभासद – शेतकयांच्या सहकार्यामुळेच ‘ अजिंक्यतारा ‘ ची घोडदौड आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले .. कारखान्याची ४१ वी वार्षिक सभा उत्साहात सपन्न …

FB_IMG_1695997890087

News By - Narayan Jadhav
सभासद- शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळेच ‘अजिंक्यतारा’ ची घोडदौड आ. शिवेंद्रसिंहराजे; कारखान्याची ४१ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न .. *सहयाद्री न्युज स्टार ११* सातारा / प्रतिनिधी . आज अजिंक्यतारा साखर कारखाना सर्व अडचणींवर मात करून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झालेला आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरले आहे. आज अजिंक्यतारा साखर कारखान्याची जी काही प्रगती झालेली आहे, जी काही घोडदौड सुरु आहे ती फक्त कारखान्याचे सभासद- शेतकरी आणि कामगार यांच्या सहकार्यामुळेच झालेली आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी करून सर्व सभासद आणि कामगारांचे आभार मानले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे खळीमेळीच्या वातावरणात, उत्साहात संपन्न झाली. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन यशवंत साळुंखे हे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, श्रीमती वनिता गोरे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश सावंत, सौ. कांचन साळुंखे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सरिता इंदलकर, मिलिंद कदम, धर्मराज घोरपडे, दादा शेळके, अरविंद चव्हाण, राहुल शिंदे, तालुका संघाचे चेअरमन दिलीप फडतरे, सुनील काटे, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष धनाजी शेडगे, वाहतूक संस्थेचे बाळकृष्ण फडतरे, रविंद्र कदम, उत्तमराव नावडकर आदी मान्यवरांची प्रमुख उपास्थीही होती.

यावेळी उच्चांकी ऊस उत्पादन करणाऱ्या, उच्चांकी ऊस पुरवठा करणाऱ्या शेकऱ्यांचा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सभासदांच्या प्रश्नांना आणि समस्यांना समर्पक उत्तरे देऊन कारखाना व्यवस्थापन सभासद शेतकऱ्यांच्या हिताचेच धोरण राबवले, त्यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे सांगितले. यंदा पाऊसमान कमी असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आपल्या कारखान्याने गाळपाचे निश्चित केलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी नोंद केलेला ऊस आपल्याच कारखान्याला पुरवठा करण्याचे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केले. यंदा उसाचे प्रमाण कमी असल्याने इतर कारखाने ऊस तोडीसाठी येतील परंतु आपली मातृसंस्था, आपली हक्काची संस्था कोणती हे कोणीही विसरू नये. उसाला उच्चतम दर देणारा, गाळपास आलेल्या उसाला १० दिवसात पहिला हप्ता देणारा कारखाना म्हणजेच अजिंक्यतारा कारखाना, हे कोणीही विसरू नये. हंगाम अटीतटीचा असला तरी सर्वांनी आपल्या हक्काच्या कारखान्याला ऊस पुरवठा करून नेहमीप्रमाणे सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केले. संचालक नामदेव सावंत यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी अहवाल वाचन केले. विश्वास शेडगे यांनी आभार मानले. सभेला वसंतराव टिळेकर, पंडितराव सावंत, मधुकर पवार, अरुण कापसे, आनंदराव कणसे, कृष्ण धनवे, सयाजी कदम, अजित साळुंखे यांच्यासह कारखान्याचे सर्व आजी- माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

शासकीय मराठी शाळे बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात तहसिलदार जावली यांना निवेदन ..
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे साताऱ्यात जोरदार स्वागत … सातारकरांशी साधला संवाद ..
महायुतीच्या विजयाची जबाबदारी भाजप घेणार .. बावनकुळे … साताऱ्यासह ४५ जागा निवडुन आणणार .. पालकमंत्री बदल ठरल्याप्रमाणेच ..
अभ्यास , छंद , खेळ या त्रिसुत्रीची सांगड घातली की यशस्वी होता येते .. ओमकार पवार . निझरेतील गणेश विकास मंडळाकडुन शिक्षक व गणवंतांचा सत्कार ..
बोंडारवाडी प्रकल्पासह कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनास मान्यता .. आ . शिवेंद्रसिहराजेंच्या पाठपुराव्याला यश .. १ टी . एम . सी . बोंडारवाडी प्रकल्पावर शिक्कामोर्तब …
महात्मा गांधी जयंती निमित्त जावली तालुक्यातील सावली गावात स्वच्छतेचा जागर .. लहान मुलांसह ग्रामस्थांनी स्वच्छ केला गाव व परिसर ..
केळघरचे सुपुत्र युवा उद्योजक समाजसेवक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ) उत्कृष्ठ समाजसेवक पुरस्काराने सन्मानित ..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर ..
इस्त्रायल शास्त्रज्ञ मिखाल याकीर यांची कास पठारला भेट ..
गोदवलेच्या राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवात ‘ पौर्णिमा प्रथमः इम्रान मोमीन सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक, सोनाली ओंबळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वैष्णवी जाधव सर्वोत्कृष्ठ बालकलाकार तर निलेश गुरव सर्वोत्कृष्ठ ..
Scroll To Top