Skip to content

स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबर शरीर तंदुरुस्त राहणे आवश्यक .. सुनिल मुनाळे .

IMG-20230918-WA0164

News By - Narayan Jadhav

स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबर शरीर तंदुरुस्त रहाणे आवश्यक – सुनिल मुनाळे
*सह्याद्री न्युज स्टार ११*
मेढा /सोमनाथ साखरे .. मॅरेथॉन सारखे उपक्रम राबविल्याने माणसाची मानसिक, शारिरीक क्षमता वाढण्यास मदत होते. स्पर्धेच्या युगात तरुणांना इतरांच्या बरोबर पळावे लागत असताना शारिरीक तंदुरुस्ती कडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबर शरीर तंदुरुस्त रहाणे आवश्यक असल्याचे मत नायब तहसिलदार सुनिल मुनाळे यांनी व्यक्त केले.
मेढा येथिल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे पी एम स्कील आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी बोलते होते. यावेळी जिल्हा पत्रकार संघटणेचे सचिव पत्रकार सोमनाथ साखरे, मोहन जगताप, बजरंग चौधरी, राजाराम ओंबळे, प्राचार्य शिंदे मॅडम, नितीन ढवळे सर आदी उपस्थित होते.
मेढा ते मामुर्डी असे ५ किलोमीटर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नायब तहसीलदार सुनिल मुनाळे यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. मॅरेथॉन स्पर्धेच्या मुलींच्या गटामध्ये अदिती शेलार हिने प्रथम क्रमांक, ऋतुजा सपकाळ हिने द्वितीय क्रमांक, ऋतुजा भिलारे हिने तृतीय क्रमांक पटकावला तसेच मुलाचे गटामध्ये शिभम मापले याने प्रथम क्रमांक, कुणाल धनावडे याने द्वितीय क्रमांक आणि रोहन तरडे याने तृतीय क्रमांक यांनी मिळविले.
मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन कूपर कॉर्पोरेशनचे देशपांडे, उद्योजक विजयजी सावले, श्री दत्त उपहार गृहचे प्रतिक पवार, कौस्तुभ पेट्रोलियमचे बापू वांगडे यांनी वस्तुरुपाने मदतीचा हात दिला. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन पवार मॅडम तर उपस्थितांचे आभार नितीन ढवळे सर यांनी मानले.
फोटो – मेढा येथिल मॅरेथॉन स्पर्धेत विजयी उमेदवारांना बक्षिस वितरण करताना सुनिल मुनाळे, सोमनाथ साखरे, शिंदे मॅडम आदी मान्यवर ( ओमकार फोटोज् मेढा )

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

बावधन बगाड मानकरी-अजित बळवंत ननावरे
अंकुश बेलोशे यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती
आ . शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना कॅबिनेट मंत्रीपद देवुन छत्रपत्रींच्या गादीचा सन्मान व्हावा – ज्ञानदेव रांजणे .
जावली तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे मार्गी लावली आहेत . तरीही विरोधी उमेदवाराला विकास दिसत नाही – आ शिवेंद्रसिहराजे भोसले .
केळघर येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन
विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मेढा पोलीस ठाणे हद्दीतील मेढा बाजारपेठ , कुडाळ बाजारपेठ व करहर बाजारपेठेत रूट मार्च
उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मेढा पोलीस स्टेशनचा सन्मान ..
जावली तालुका मंडलाधिकारी व तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री संदिप ढाकणे यांची निवड ..
अमितदादांच्या मुळे राष्ट्रवादीत बेरजेचे राजकारण…-सुरेश पार्टे..
विकास सेवा सोसायट्यांनी उत्पन्न वाढीचे प्रयत्न करावेत आ शिवेंद्रसिंहराजे भोसले .
Scroll To Top