बोंडारवाडी धरण जो पर्यंत होत नाही तो पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठींबा नाही … बोंडारवाडी धरण कृती समिती पुणे विभाग व जावली युवा प्रतिष्ठाण पुणे विभागाच्या वतीने शपथ घेण्यात आली .

News By - Narayan Jadhav
बोंडारवाडी धरण जो पर्यंत होत नाही तो पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठींबा नाही ..
*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर (नारायण जाधव )
बोंडारवाडी धरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही असे पुणे विभागाचे वतीने शपथ घेणेत आली दि. २० सप्टेंबर २०२३ रोजी जलनायक स्व. विजयरावजी. मोकाशी साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन व धरणाच्या सद्यस्थिती बाबत आढावा घेण्यासाठी रविवार दि १०/ ०९/ २०२३ रोजी बोंडारवाडी धरण कृती समिती पुणे विभाग व जावली युवा प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने पुणे येथे मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.
केळघर येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. तसेच जनजागृती साठी प्रत्येक गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी बोंडारवाडी धरण कृती समितीचे बॅनर लावण्यात यावेत व ती जबाबदारी प्रत्येक गावातील मंडळातील सभासद व ग्रामस्थांनी घ्यायचे ठरले. आपल्या शेजारील सोळशी धरणाचा लढा मागून चालू होवून पुर्ण होणाच्या मार्गावर आहे. तरी बोंडारवाड़ी धरणाला उशीर का होतोय ? असा प्रश्न सभासदांनी उपस्थित केला. त्यामध्ये प्रशासकीय दिरंगाई व सरकारची इच्छाशक्तीची कमतरता कमी पडत असेल तर जोपर्यंत धरण होणार नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला पुणे विभागाच्या वतीने पाठिंबा दिला जाणार नाही अशी शपथ घेण्यात आली. प्रास्ताविक प्रकाश शेलार यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुणे विभागाचे निमंत्रक आनंदा जुनघरे यांनी केले. वैभव ओंबळे यांनी धरणाच्या सद्यस्थितीबाबत व केळघर येथे होणाऱ्या मेळाव्यासंदर्भात मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी मुंबई विभागातून एकनाथ ओंबळे , नारायण सुर्वे, विश्वनाथ धनावडे , विष्णू धनावडे , जनार्दन मोरे तसेच जावली प्रतिष्ठानचे सर्व सभासद व महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते. पुणे विभागातील एकनाथ सपकाळ,नारायण धनावडे , ज्ञानदेव शेलार , महेंद्र पार्टे, विकास जुनघरे, व इतर सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार अजय धनावडे यांनी मानले

