मराठा आरक्षणासाठी मेढ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..

News By - Narayan Jadhav
मराठा आरक्षणासाठी मेढ्यात बंद
लाठीचार्जचा केला निषेद, संमिश्र प्रतिसाद
*सहयाद्री न्युज स्टार ११*
मेढा ( सोमनाथ साखरे )
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी येथिल मराठा आरक्षण मोर्चावर झालेल्या लाठीचार्ज विरोधात निषेद व्यक्त करण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळण्यासाठी जावली तालुक्यातील कुडाळ, केळघर, करहर सह मेढा बाजार पेठेत बंद ठेवण्यात आल्या. दरम्यान काही काळ रस्तारोको करण्यात आला.
सातारा जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आल्यानंतर त्याचे पडसाद जावली तालुक्यात उमठले. आज मेढा येथिल आठवडा बाजाराचा दिवस असल्याने अनेक व्यापारी तरकारी घेवुन व्यापारी मेढा येथे दाखल झाले होते परंतु स्थानिक व्यापार्याची दुकाने बंद असल्याचे दिसून आल्याने सर्व व्यापारी परतीच्या मागाने निघून गेले.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी येथिल मराठा आरक्षणासंदर्भात निघालेल्या मोर्चावर पोलीसांनी लाठीचार्ज करून अनेकांना जखमी केले त्यांचा निषेद करण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळविण्यासाठी लोकांनी बाजार चौकात ठिया अंदोलन केले. यावेळी उपस्थितांनी मराठा आरक्षणावर आप आपली मते व्यक्त केली.
बाजार चौकात सभा संपविल्यानंतर मोर्चातील सर्व अंदोलकांनी तहसिल कार्यालयात जावुन निवेदन दिले. तसेच सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष तासगावकर यांना निवेदन दिले. निवेदनात अंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्यांना सेवेतुन बडतर्फ करावे, अंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे काढण्यात यावेत तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात पुकारलेल्या बंद मुळे मेढा आगाराचे वेळापत्रक कोलमडले त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. खाजगी वाहतुक सुध्दा बंद ठेवल्यात आली होती.
चौकट –
मेढा येथिल बाजारपेठेतील अनेक व्यापारी वर्गाने समोरून दुकाने बंद करून बंद मध्ये सहभाग नोंदविला असला तरी ठराविक दुकानदारांनी दुकानांचे मागील (चोर ) दरवाजे सुरु ठेवल्याची चर्चा दिवसभर सुरु होती तर बाहेरून आलेल्या व्यापार्यांनी आम्हाला एक न्याय व स्थानिकांना एक न्याय याबाबत नाराजी व्यक्त केली.
फोटो – मेढा येथिल बाजार पेठेत शुकशुकाट
मेढा येथे रस्ता रोको करताना अंदोलक
( सोमनाथ साखरे )

