मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई उदयनराजेंची भेट .

News By - Narayan Jadhav
*मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी शंभूराज देसाईं उदयनराजेंची भेट*
*सह्याद्री न्युज स्टार ११*
सातारा : प्रतिनिधी .
जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्या नंतर सरकार विरोधात तीव्र असंतोष कमी होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.मराठा आरक्षणाबाबत शासनाची भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणी बाबत माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण समिती सदस्य या नात्याने उदयनराजे यांची भेट घेतल्याचे देसाईंनी सांगितले.

