Skip to content

गवडी गावचे सुपुत्र कुमार मयूर पवार यास महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर…..

IMG-20250416-WA0041.jpg

News By - Sahyadri_News


*सहयाद्री न्युज स्टार ११*   
केळघर /नारायण जाधव .
   गवडी ता .जावली गावचा सुपुत्र कु . मयूर पवार यास महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार जाहिर झाला आहे .    अकाली वडिलांचे छत्र हरपले…फार काही कोणाचा आधार नसताना शिक्षकांच्या आणि ग्रामस्थांच्या मनोबलाच्या पाठबळावर जन्मदात्या मातेचा आशीर्वाद घेऊन क्रीडा प्रबोधिनी ला यश मिळवले. एकापाठोपाठ एक राष्ट्रीय मेडल्स घेत गेला. आंतरराष्ट्रीय पातळीवरही ॲथलेटिक्स मध्ये चमकदार कामगिरी केली. गुवाहाटी येथील आशियाई राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून जावली तालुक्याची आणि सातारा जिल्ह्याची मान उभ्या देशांमध्ये उंचावली.

प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये स्वतःचं अंगीभुत कौशल्य पणाला लावून क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष करून सायकलिंग मध्ये आपला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अविठ ठसा उमटवला. शुक्रवारी बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या भरगच्च कार्यक्रमा मध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार मयूरला प्रदान करण्यात येणार आहे.. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा अविट ठसा उमटवून जावली तालुक्याचं नाव देशाच्या नकाशावर नेण्याचं काम मयूर सारख्या एका धुरंदर हिऱ्यानेखऱ्या अर्थाने केले आहे.

जावली वाशियांसाठी ही अभिमानाची बाब आहे.बहुदा जावली तालुक्यातील हा पहिलाच शिवछत्रपती पुरस्कार असावा आणि त्यामुळेच मयूर सारख्या क्रीडा क्षेत्रामध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूचे वेगळेपण अधोरेखित होते.कुमार मयूर याचे समस्त जावली तालुक्यातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून  पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहेत .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

ओला दुष्काळ जाहीर करा !
शेतकऱ्यांची भव्य मोर्चाने शासनाकडे मागणी ..
जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा –
या मागणीसाठी राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मोर्चा…
डॉ . पल्लवी पवार हिचा यथोचित सन्मान .
बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण
कल्याणराव दळे ; मेढा येथे नाभिक महामंडळाची बैठक
भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
सरकार व पुरातत्व विभागाला शिवमंदिर बांधता येत नसेल तर मला मंदिर बांधण्याची परवानगी द्या — कुमुदिनी चव्हाण
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ओझरे शाळेस भेट…
बावधन बगाड मानकरी-अजित बळवंत ननावरे
अंकुश बेलोशे यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती
आ . शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना कॅबिनेट मंत्रीपद देवुन छत्रपत्रींच्या गादीचा सन्मान व्हावा – ज्ञानदेव रांजणे .
Scroll To Top