Skip to content

जावली तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे मार्गी लावली आहेत . तरीही विरोधी उमेदवाराला विकास दिसत नाही – आ शिवेंद्रसिहराजे भोसले .

IMG-20241116-WA0018.jpg

News By - Sahyadri_News

*सहयाद्री न्युज स्टार ११*
   

केळघर / नारायण जाधव .
  संपूर्ण जावली तालुक्यात प्रत्येक गाव, वाडी, वस्ती येथे कोट्यवधींची विकासकामे मार्गी लागली आहेत. सातारा- जावली मतदारसंघात हजारो कोटींची विकासकामे झाली तरीही विरोधी उमेदवाराला विकास दिसत नाही, याचे नवल वाटायचे काहीच कारण नाही. दुसऱ्यांना लुबाडून स्वतःचे पोटपाणी चालवणाऱ्यांना झालेला विकास कसा दिसेल? कधी म्हणायचं कोयनेचा सुपुत्र तर कधी जावलीचा सुपुत्र! बरोबर आहे, ज्याने कोयना प्रकल्पग्रस्थांच्या पुनर्वसनातील जमिनी कमिशनसाठी बिल्डर्सना विकल्या तोच हा कोयनेचा सुपुत्र आहे. पण सर्वांनी लक्षात ठेवा मी तुमचा मुलगा आहे आणि मी तुमची सेवा आणि प्रयेक गावाचा विकास करण्यात कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.


यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले विरोधक बोंडारवाडी धरणाबाबत अफवा पसरवत आहेत परंतु या भागातील ५४ गावातील कृती समितीला बरोबर घेवुन डॉ . भारत पाटणकरां सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेवुन पाठपुरावा करून कण्हेर धरनातील १ टीएमसी पाठीसाठा राखीव ठेवला आहे . कै विजयराव मोकाशी यांची स्वप्नपुर्ती करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने बोंडारवाडी धरण पूर्ण करणार असुन या बोंडारवाडी धरणाला ‘ विजय सागर ‘ असे नाव देण्यात येईल असे सांगितले .


                सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रचारार्थ केळघर ता. जावली येथे आयोजित भव्य मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी सदस्य अर्चना रांजणे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, कांचन साळुंखे, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे ,बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, रामभाऊ शेलार, शिवसेनेचे एकनाथ ओंबळे, आरपीआयचे एकनाथ रोकडे, प्रशांत तरडे, सागर धनावडे, मोहन कासुर्डे, दत्ता पवार, पांडुरंग जवळ, प्रमोद पार्टे, हरिभाऊ शेलार, बबन बेलोशे, नाना जांभळे, कविता धनावडे, निर्मला दुधाने, संतोष कासुर्डे, विकास ओंबळे, राजू खुडे, अंकुश बेलोशे विकास देशपांडे , आदिनाथ ओंबळे , विकास ओंबळे , पांडुरंग जवळ , जयश्री शेलार आदी मान्यवरांसह कुसूंबी गटातील सर्व आजी- माजी पदाधिकारी, महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ व माता- भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या.


             आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, निवडणुकीपुरता जनतेचा कळवळा आणून चालत नाही. त्यासाठी जनसपंर्क पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि महत्वाचे म्हणजे लोकांच्यात राहिले पाहिजे. विरोधी उमेदवार निवडणुकीआधी तुम्हाला कधी भेटले होते का? तुमच्या अडचणीत ते कधी समोर आले का? मग आत्ताच त्यांना जनतेची आठवण का झाली? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मतदारसंघातील जनतेला माहिती आहेत. त्यामुळे विरोधी उमेदवाराने जनसेवेचे कितीही सोंग वठवण्याचा प्रयत्न केला तरी जनता भुलणार नाही. माझ्यावर प्रेम करणारी जनता कायम माझ्या पाठीशी राहिली आहे आणि या निवडणुकीत मला विक्रमी मताधिक्याने विजयी करून माझी मायबाप जनता एक आगळावेगळा इतिहास घडवेल याची मला खात्री आहे. प्रत्येकाने स्वतः मतदान करायचे आहे आणि इतर मतदारांनाही मतदान करायला लावायचे आहे. कमळ या चिन्हापुढील बटन दाबून इतिहास घडवण्यासाठी सातारा- जावली मतदारसंघातील जनता सज्ज झाली आहे. त्यामुळे विरोधी उमेदवाराला बोजाबिस्तारा घेऊन गाशा गुंडाळावा लागणार आहे हे निश्चित!


यावेळी ज्ञानदेव रांजणे, एकनाथ ओंबळे , दत्ताआण्णा पवार आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून आ. शिवेंद्रसिंहराजेंना विक्रमी मतांनी विजयी करावे असे आवाहन केले.
  यावेळी प्रास्ताविक रामभाऊ शेलार व सागर धनावडे यांनी केले तर आभार विजय सपकाळ यांनी मानले .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

ओला दुष्काळ जाहीर करा !
शेतकऱ्यांची भव्य मोर्चाने शासनाकडे मागणी ..
जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा –
या मागणीसाठी राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मोर्चा…
डॉ . पल्लवी पवार हिचा यथोचित सन्मान .
बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण
कल्याणराव दळे ; मेढा येथे नाभिक महामंडळाची बैठक
गवडी गावचे सुपुत्र कुमार मयूर पवार यास महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर…..
भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
सरकार व पुरातत्व विभागाला शिवमंदिर बांधता येत नसेल तर मला मंदिर बांधण्याची परवानगी द्या — कुमुदिनी चव्हाण
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ओझरे शाळेस भेट…
बावधन बगाड मानकरी-अजित बळवंत ननावरे
अंकुश बेलोशे यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती
Scroll To Top