Skip to content

सातारा – जावलीतील २६ ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी ५ कोटी २० लाख .. आ शिवेद्रराजेचा पाठपुरावा ; राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून मिळवला निधी ..

Screenshot_2024-07-11-16-01-51-39_a23b203fd3aafc6dcb84e438dda678b6

News By - Narayan Jadhav

सातारा- जावलीतील २६ ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी ५ कोटी २० लाख
आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून मिळवला निधी.
*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव .
सातारा- जावली विधानसभा मतदारसंघातील २६ ग्रामपंचायतींच्या नवीन इमारत बांधकामासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून तब्ब्ल ५ कोटी २० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी या योजनेतून हा निधी मंजूर झाला असून मंजूर निधीतून सातारा तालुक्यातील १३ आणि जावली तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींना नवीन स्वतंत्र कार्यालय इमारत बांधून मिळणार आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून हा निधी मंजूर करण्यात आला असून नवीन इमारतींमुळे या २६ ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुरळितपणा येण्यास मदत होणार आहे. सातारा तालुक्यातील वेणेखोल, बेंडवाडी, मोरेवाडी, निगुडमाळ, पिलाणी, मस्करवाडी, वावदरे, राकुसलेवाडी, आरगडवाडी, बोपोशी, चाळकेवाडी, साबळेवाडी आणि पेट्री- अनावळे या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

जावली तालुक्यातील कुंभारगणी, शिंदेवाडी, अंधारी कास, मरडमुरे, पानस, म्हाते बु., केसकरवाडी, काटवली, वरॊशी, रानगेघर, बामणोली कसबे, मोहाट आणि नांदगणे या ग्रामपंचायतींच्या नवीन कार्यालय इमारत बांधकामासाठी प्रत्येकी २० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून मंजूर इमारतींचे बांधकाम त्वरित सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी बांधकाम विभागाला केल्या आहेत. 

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

सातारा- जावलीतील २२ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ४.४० कोटी
आईच्या स्मृतिदिनी जि.प. शाळांना स्मार्ट टिव्ही
आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन नांदगणे पुनवडी पुलासाठी ५ कोटींहुन अधिक निधी मिळाला असुन पुलाचे काम अंतिम टप्यात आहे
केळघर परिसरासह घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग , वेण्णा नदी पात्र दुथडी भरुण वाहत आहे 
वाघनखं अनावरण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत सर्किट हाऊस ते संग्रहालय रॅलीचे आयोजन ..
आंबेघरमध्येही प्रतिपंढरपूर विठ्ठलधाम दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा.
आंबेघर येथील प्रतिपंढपूर विठ्ठलधाममध्ये दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
आंबेघर येथील प्रतिपंढरपुर विठ्ठलधाम मध्येही दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी १५ कोटी निधी मंजुर . आ . शिवेंद्रसिंहराजेच्या पाठपुराव्याला यश.. . उभारणीचे काम लवकरच होणार सुरु .
डांगरेघर येथील मित्रमेळा फाऊंडेशन जावली व न्यु अजिंक्य क्रिकेट क्लब ,ग्रामपंचायतीच्या वतीने १००० पेक्षा जास्त वृक्षलागवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला
Scroll To Top