Skip to content

डांगरेघर येथील मित्रमेळा फाऊंडेशन जावली व न्यु अजिंक्य क्रिकेट क्लब ,ग्रामपंचायतीच्या वतीने १००० पेक्षा जास्त वृक्षलागवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला

IMG-20240710-WA0006

News By - Sahyadri_News

सहयाद्री न्युज स्टार ११

केळघर / नारायण जाधव .

जुलै महिन्यातला पहिला शनिवार व रविवारी सुट्टीचे औचित्य साधून एक दिवस गावासाठी पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी हा संदेश देत डांगरेघर ता. जावली येथील न्यू अजिंक्य क्रिकेट क्लब व मित्रमेळा फाउंडेशन जावली आणि ग्रामपंचायत डांगरेघर यांच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धावली डांगरेघर घाट रस्त्याच्या दुतर्फा तसेच मंदिर परिसरात प्राथमिक शाळा परिसरात तसेच आंबेघर बोडारवाडी रस्त्याच्या दुतर्फा 1000 पेक्षा जास्त झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

सध्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून या मुळे निसर्गाची खूप मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.तसेच वणव्यामुळे सुद्धा हजारो झाडे नष्ट होतात. त्यामुळे वृक्षारोपण हि काळाची गरज असून पुढच्या पिढयांचे स्वास्थ बळकट करायचे असेल तर वृक्षारोपण खूप महत्वाचे आहे. तशीच समाजातील प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करत वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करावे ही भावना व्यक्त केली वड,पिंपळ,आंबा जांभूळ, करंज, बेल, शेवगा, कवट आवळा या वृक्षांची लागवड करण्यात आली.

तसेच यावेळी गावात जावली तालुक्यातील मित्रमेळा फाउंडेशन च्या माध्यमातून डांगरेघर असणाऱ्या प्राथमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य या मध्ये स्कुल बॅग, वह्या, पेन, कंपास, कलर साहित्य भेट देण्यात आले मुंबई स्थित निसर्ग प्रेमी ग्रामस्थांकडून या कामासाठी देणगी स्वरूपात लाखो रुपयांची रक्कम गोळा झाली त्यातून झाडे तसेच पुढील वृक्षसंगोपणासाठी उपाययोजना बाबतचे चे नियोजन करण्यात आले या वेळी मित्रमेळा फाउंडेशन चे सर्व सभासद , न्यू अजिंक्य क्रिकेट क्लब चे सर्व सदस्य,ग्रामपंचायत डांगरेघर चे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच डांगरेघर ग्रामस्थ उपस्थित होते अमोल आंग्रे यांनी मित्रमेळा फाउंडेशन,न्यू अजिंक्य क्रिकेट टीम आणि सर्व निसर्गप्रेमींचे आभार म्हणून हा कार्यक्रम संपन्न झाला …..

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

ओला दुष्काळ जाहीर करा !
शेतकऱ्यांची भव्य मोर्चाने शासनाकडे मागणी ..
जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा –
या मागणीसाठी राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मोर्चा…
डॉ . पल्लवी पवार हिचा यथोचित सन्मान .
बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण
कल्याणराव दळे ; मेढा येथे नाभिक महामंडळाची बैठक
गवडी गावचे सुपुत्र कुमार मयूर पवार यास महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर…..
भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
सरकार व पुरातत्व विभागाला शिवमंदिर बांधता येत नसेल तर मला मंदिर बांधण्याची परवानगी द्या — कुमुदिनी चव्हाण
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ओझरे शाळेस भेट…
बावधन बगाड मानकरी-अजित बळवंत ननावरे
अंकुश बेलोशे यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती
Scroll To Top