केळघर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी युवा उद्योजक श्री सुनिल जांभळे (नाना ) यांची निवड झालेने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला यथोचित सत्कार ..

News By - Narayan Jadhav
केळघर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी युवा उद्योजक श्री सुनिल जांभळे (नाना) यांचे निवड झालेने आ . शिवेंद्रराजेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव ..
जावली तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या केळघर विकास सेवा सोसायटीस जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातुन सर्वतोपरी सहकार्य करणार असुन भविष्यात सुनिल जांभळे (नाना) यांच्या माध्यमातून केळघर विकास सेवा सोसायटी अजुन जोमाने काम करून विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होईल अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली .
नुकतीच केळघर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुनिल जांभळे (नाना) यांची बिनविरोध निवड झाली याचे औचित्य साधुन केळघर विकास सेवा सोसायटीचे सर्व संचालक मंडळाने आमदार शिवेंद्रसिंहराजें भोसले यांची सदिच्छा भेट घेतली . आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते नुतन चेअरमन श्री सुनिल जांभळे (नाना) यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते .
यावेळी केळघर सोसायटीचे व्हा चेअरमन तुकाराम पार्टे, संचालक रामभाऊ शेलार , हरिभाऊ शेलार, संपत सुर्वे , जगन्नाथ शेलार , लक्ष्मण जाधव , शशिकांत शेलार यांचेसह शांताराम बेलोशे , आवेश बिरामणे यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले नुतन चेअरमन श्री सुनिल जांभळे (नाना) यांचे माध्यमातुन केळघर विकास सेवा सोसायटीचा पहिल्यापेक्षा जास्तीत जास्त कायापालट करून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ते प्रयत्न करतील व विविध योजनांचा लाभ सर्व सभासदांना मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा दिल्या .
तर नुतन चेअरमन श्री सुनिल जांभळे (नाना) म्हणाले आ शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हा बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व संचालक व सभासदांना सोबत घेवुन शेतकऱ्यांच्या उन्नती साठी सर्वतोपरी प्रयत्नशील असुन जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली










