Skip to content

आसणी ता . जावली येथे हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा ..

IMG-20240126-WA0555

News By - Narayan Jadhav

आसणी तालुका जावळी येथे हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा…..
*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव .
गेली दोन महिने आसनी गावामध्ये श्री भैरवदेव आशिलामाल मंदिराच्या परिसरात मराठीतील बिगबजेट असणाऱ्या एका ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. नियोजित सर्व चित्रीकरण संपवून पुढच्या दौऱ्यावर निघण्याची तयारी सुरू होती. सर्वांची लगबग सुरू होती तर प्रॉडक्शन टीम ची राज्याभिषेक सोहळा कुठे घ्यायचा याची चर्चा सुरू होती याच वेळी या परिसरात असणाऱ्या एका झाडावर हुबेहूब महाराजांची प्रतीमा दिसली. यावेळी सर्व उपस्थितांची फोटो काढण्यासाठी लगबग सुरु झाली व सेटवर खुद्द महाराज अवतरलेची चर्चा सुरु झाली. मात्र याच वेळी तेथे उपस्थित असणारे छत्रपतींवर निस्सीम प्रेम करणारे चित्रपट निर्माते, संदीपमोहिते पाटील यांनी नतमस्तक होत महाराजांचे दर्शन घेतले. तेव्हा तेथे उपस्थित असणाऱ्या गावकऱ्यांनी यांना विनंती केली की राज्याभिषेक सोहळा येथेच करा. तेव्हा क्षणाचा ही विचार न करता ठिकाण ठरलं आणि मुहूर्त ठरला दि २२ जाने. २०२४
आणि हाच दिवस इतिहासाने नोंद घ्यावी असा ठरला. पूर्ण भारत वर्षाला वंदनीय असणाऱ्या श्रीरामांच्या अयोध्या आगमनाचे औचित्य साधून श्री. संदीप मोहिते पाटील निर्मित आणि श्री. तुषार विजयराव शेलार दिग्दर्शित “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” या चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेकाचे चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री. महेश अणे यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. मु. पो. आसनी, ता. जावळी, जि. सातारा येथे या राज्याभिषेक सोहळ्याचे भव्य चत्रिकरण पार पडले. ४ दिवस चाललेल्या या चित्रीकरणादम्यान ११००-१२०० कलाकारांची वरदळ आणि उर्विता प्रॉडक्शन्स ने उभारलेले भव्य रायगडाचे स्वरूप शिवकालीन आभास देणारे होते. आसनी गावच्या ग्रामस्थांच्या निस्वार्थ प्रेमाने आणि सहकार्याने चित्रीकरण निर्विघ्न पार पडले. चित्रपटाचे प्रोडूसर्स श्री. संदीप मोहिते पाटील, श्री. धर्मेंद्र बोरा, श्री. केतनराजे भोसले आणि श्री. सौजन्य निकम यांनी सर्वांचे आभार मानत, ही सेवा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राजमाता जिजाऊंच्या चरणी अर्पण केली.
ग्रामस्थ मंडळ आसनी यांनी आभार मानले या वेळी बोलत असताना सामाजिक कार्यकर्ते सागर धनावडे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐत्यहासिक जावळी तालुक्यातील आसनी येथे सुरू असलेल्या चित्रीकरणास आ.श्री. छ. शिवेंद्रसिंह राजे भोसले व ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या सुचने नुसार आम्ही आसनी ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. तसेच परिसरातील सर्व व्यावसायिकांची आर्थिक उलाढाल वाढली असून बऱ्याच बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
या पुढे देखील आजून कोण प्रोजेक्ट करणार असेल तर त्याना संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आहवान सागर धनावडे यांनी केले .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

ओला दुष्काळ जाहीर करा !
शेतकऱ्यांची भव्य मोर्चाने शासनाकडे मागणी ..
जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा –
या मागणीसाठी राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मोर्चा…
डॉ . पल्लवी पवार हिचा यथोचित सन्मान .
बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण
कल्याणराव दळे ; मेढा येथे नाभिक महामंडळाची बैठक
गवडी गावचे सुपुत्र कुमार मयूर पवार यास महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर…..
भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
सरकार व पुरातत्व विभागाला शिवमंदिर बांधता येत नसेल तर मला मंदिर बांधण्याची परवानगी द्या — कुमुदिनी चव्हाण
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ओझरे शाळेस भेट…
बावधन बगाड मानकरी-अजित बळवंत ननावरे
अंकुश बेलोशे यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती
Scroll To Top