सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील डॉ . भीमराव आंबेडकर ..

News By - Narayan Jadhav
सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील : डॉ. भीमराव आंबेडकर
*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव ..
येणाऱ्या सार्वजनिक निवडणुकांत सत्तेच्या बॅलन्समध्ये वंचितचे काम महत्वपूर्ण ठरणार आहे. भाजपाविरोधातील आघाडीत वंचित राहिला तर नक्कीच राज्यात व केंद्रात सता येईल. त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेची प्रलंबित कामे मार्गी लागतील. असा आशावाद डॉ.ऍड.भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केला.
भारतीय बौद्ध महासभेतर्फे पोलीस परेड ग्राऊंड मेढा,ता. जावली येथे १० वी बौद्ध धम्मपरिषद,दीक्षा समारंभ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अशा संयुक्तिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव आंबेडक मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष मोहन खरात होते. यावेळी राष्ट्रीय माजी सचिव नाथा ममता आगणे, जिल्हाध्यक्ष सुदाम ढापरे (प.), महाविहार बांधकाम कमिटीचे अध्यक्ष व्ही.आर. थोरवडे,समता सैनिक दल ऑफिसर दादासाहेब भोसले, वानखेडेसाहेब आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.भीमराव आंबेडकर म्हणाले, “लोकसभा व विधानसभेची येणारी निवडणूक महत्वाची आहे.लोकांनी सत्य-असत्य ओळखायला शिकले पाहिजे. नेत्यापेक्षा समाज महत्वाचा आहे. संविधान विरोधकांना धडा शिकविण्याची वेळ जवळ आली आहे.खरे आबेडकर अनुयायीच ईव्हीएम सारख्या प्रवृत्ती विरोधात लढू शकतात.कर्नाटक राज्यात तीन -चार धम्म परिषदांच्या माध्यमातून धम्मपरिवर्तनाबरोबरच विधानसभेतही बदल करण्यास मदत झाली होती.त्यामुळे बदलाच्या प्रक्रियेत सामील झाले पाहिजे.बुद्धांच्या विचाराने बाबासाहेबांनी अडीच हजार वर्षांनंतर धम्मदिक्षा देऊन जीवनातील शेवटची क्रांती घडवली होती.त्यामुळेच देशाच्या काना-कोपऱ्यात धम्मक्रांतीचा रथ घेऊन जाता आला.जो मनापासून भारतीय बौद्ध महासभेचे कार्य करतो.तोच खऱ्या अर्थाने धम्म प्रचारक ठरतो. इतिहास माहीत असला तरच तो विशाल दृष्टिकोनातून कार्य करेल.अजुनही ओबीसी व इतर धम्मदीक्षा घेत आहेत.तेव्हा बाबासाहेबांनी धम्म चळवळीबरोबरच इतर संस्थाची निर्मिती केली होती.तिचे पुनर्जीवित करणे गरजेचे आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर हल्ले झाले होते.तरीही म.फुले यांच्या मदतीने शिक्षणाचे महान कार्य केले.समाजाची प्रगती ही त्या त्या समाजातील महिलांच्या शिक्षणावर आढळुन असते.बुद्धाचा धम्म सत्यशोधक पद्धतीने फुले दाम्पत्यानी दिला.”
भाजपाबरोबर गेलेल्या प्रवृत्तीवर अनेक उदाहरणांच्या साहाय्याने डॉ.भीमराव आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण व संयमाने हल्लाबोल केला.यावेळी जगदीश गवई,नाथा ममता आगाणे (काका), व्ही.आर.थोरवडे, बाळकृष्ण देसाई,चंद्रकांत खंडाईत,अरुण पोळ,मनीषा खरात, काजल परिहार आदींनी मनोगत व्यक्त केली.
प्रारंभी, शहरांतून धम्म रॅली जोशपूर्ण काढण्यात आली. तद्नंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.आंबेडकर, बुद्ध आदी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रकाश सकपाळ यांनी प्रास्ताविक केले.भीमराव परिहार यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.
सदरच्या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर,अधिकारी,पदाधिकारी,कार्यकर्ते,पत्रकार,उपासक-उपासिका यांच्यासह भारतीय बोध्द महासभा जिल्हा आजी-माजी पदाधिकारी,जावली तालुक्यातील सर्व पदाधिकारी बोध्दाचार्य, केद्रिंय शिक्षक, समता सैनिक व वंचित बुहजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, आंबेडकर कुटुंबाशी एकनिष्ठ असणारे सर्व श्रध्दा व शिलवान,संविधान प्रेमी व विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. याकामी,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मोहन खरात, कोषाध्यक्ष शिवराम कांबळे, सचिव कृष्णकांत सपकाळ,सर्व उपाध्यक्ष व संपूर्ण कार्यकारिणी यांच्यसह वंचितचे पदाधिकारी आदींनी अथक असे परिश्रम घेतले.
- फोटो : मार्गदर्शन करताना डॉ.भीमराव आंबेडकर शेजारी मान्यवर.










