Skip to content

समाजसेवक श्री ज्ञानदेव रांजणे (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ..

WhatsApp-Image-2023-12-31-at-10.18.49-PM

News By - Narayan Jadhav

केळघर / नारायण जाधव ..


सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक , समाजसेवक श्री ज्ञानदेव रांजणे साहेब यांचा १ जानेवारी रोजी वाढदिवस आहे . त्यांच्या वाढदिवसाचे औच्युत्य साधुन केळघर विभागासह संपूर्ण जावली तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन जावली तालुक्याची राजधानी मेढा येथे आदरनिय ज्ञानदेव रांजणे साहेब मित्र समुह , शौर्य करिअर अकॅडमी , व सर्व मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे .


कुसुंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येथील आशा सेविकांच्या मिटिंगसाठी बसण्याच्या व्यवस्थेसाठी श्रीमंत छत्रपती छ. शिवेंद्रसिंहराजे २१ गाव मित्र समुहाच्या वतीने खुर्चा देण्यात येणार आहेत व येथील रुग्नांसाठी फळे व खाऊवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. व केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्नांसाठी फळे व खाऊवाटप करण्यात येणार असुन आसणी (गाडीतळ ) येथील कातकरी वस्तीत ब्लँकेट व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात येणार आहे.


सावली गावचे लोकनियुक्त सरपंच श्री विजय सपकाळ यांनी श्री ज्ञानदेव रांजणे (साहेब) यांचे वाढदिवसाचे औचित्य साधुन गेले आठ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असुन आज वाढदिवसानिमित्त मोफत डोळे तपासणी व ऑपरेशन शिबीराचे आयोजन केले असुन त्याचा लाभ परिसरातील रुग्नांनी घ्यावा असे आवाहनही ज्ञानदेव रांजणे मित्र समुह व युवा उद्योजक सागरजी धनावडे ( सर ) यांनी केले आहे.


वाढदिवसानिमित्त आदरनिय ज्ञानदेव रांजणे साहेब बाहेरगावी असल्याने प्रत्यक्ष भेटु शकणार नाहीत तरी त्यांना मोबाईल व शोशल मिडियाच्या माध्यमातुन शुभेच्या द्याव्यात असे ज्ञानदेव रांजणे साहेब मित्र समुह व सागरजी धनावडे (सर) यांचे वतीने सांगण्यात आले आहे .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

ओला दुष्काळ जाहीर करा !
शेतकऱ्यांची भव्य मोर्चाने शासनाकडे मागणी ..
जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा –
या मागणीसाठी राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मोर्चा…
डॉ . पल्लवी पवार हिचा यथोचित सन्मान .
बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण
कल्याणराव दळे ; मेढा येथे नाभिक महामंडळाची बैठक
गवडी गावचे सुपुत्र कुमार मयूर पवार यास महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर…..
भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
सरकार व पुरातत्व विभागाला शिवमंदिर बांधता येत नसेल तर मला मंदिर बांधण्याची परवानगी द्या — कुमुदिनी चव्हाण
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ओझरे शाळेस भेट…
बावधन बगाड मानकरी-अजित बळवंत ननावरे
अंकुश बेलोशे यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती
Scroll To Top