बोंडारवाडी धरणासाठी महिलाचा एल्गार ….

News By - Sahyadri_News
आई श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने केडंबे येथील २०० हुन अधिक महिला कोल्हापुरच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनास रवाना .. बोंडारवाडी धरण लवकरात लवकर व्हावे म्हणुन घालणार महालक्ष्मी देवीला साकडे ..
केळघर / नारायण जाधव .
बोंडारवाडी धरण लवकरात लवकर व्हावे यासाठी केडंबे ता . जावली येथील 200 हुन अधिक महिलाकोल्हापुरच्या महालक्ष्मी देवीला घालणार साकडे .
नियोजीत बोंडारवाडी धरण लवकरात लवकर व्हावे यासाठी आई श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने केडंबे येथील २०० हुन अधिक महिला व केळघर परिसरातीलही महिला बोंडारवाडी धरण कृती समितीचे पदाधिकारी आज सकाळी केडंबेहुन कोल्हापुरसाठी रवाना झाले .
केळघर बाजारपेठेत बोंडारवाडी धरण कृती समितीचे सर्व पदाधिकार यांनी श्रीफळ वाढवले व सदर बस कोल्हापुरकडे रवाना झाल्या .
यावेळी केळघर बाजारपेठेतून बोंडारवाडी धरण कृती समितीचे सर्व पदाधिकारी व महिलांनी बोंडारवाडी धरण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बाप्पाचे ‘ स्व विजयराव मोकाशी साहेबांचा विजय असो ‘ काम हाताला पाणी शेतीला अशा अनेक घोषणांनी परिसर दणाणुन गेला होता .

यावेळी एकनाथ ओंबळे , उद्योजक राजेंद्र धनावडे , आदिनाथ ओंबळे, वैभव ओंबळे , श्रीरंग बैलकर , राजेंद्र गाडवे, उषा उंबरकर , यांचेसह बोंडारवाडी धरण कृती समितीचे पदाधिकारी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या .

फोटो : बोंडारवाडी धरण लवकरात लवकर व्हावे यासाठी केडंबे येथील २०० हुन अधिक महिला कोल्हापुरच्या महालक्ष्मी देवीस साकडे घालण्यास रवाना .
छायाः नारायण जाधव .










