Skip to content

शासकीय मराठी शाळे बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात तहसिलदार जावली यांना निवेदन ..

IMG-20231006-WA0231

News By - Narayan Jadhav

शासकीय मराठी शाळे बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात तहसीलदार जावली यांना निवेदन ..
*सहयाद्री न्युज स्टार ११*
मेढा / प्रतिनिधी .
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा यांचा २० पेक्षा पट कमी असल्यास त्या बंद करून त्या ठिकाणी समूह शाळा काढणार असल्याचा नुकताच शासनाने अध्यादेश काढलेला आहे या काढलेल्या आदेशाचां रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने निषेध करून सदर बाब गंभीर स्वरूपाची असून याचा परिणाम शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब जनतेवर होणार आहे तसेच जास्तीत जास्त परिणाम मुलींच्या शिक्षणावर होणार आहे कारण समूह शाळा ज्या विभागात काढणार ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागणार आहे त्यामुळे सदरची योजना अजिबात बरोबर नाही ही समाजाला घातक असून बहुजन समाजाला शिक्षणापासून पुन्हा वंचित ठेवण्याचे षडयंत्र या सरकारने केले आहे, त्याला तीव्र विरोध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावळी तालुक्याच्या वतीने सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड बापू यांच्या आदेशावरून मा तहसीलदार जावली यांना निवेदन देण्यात आले या वेळी रि .पा .ई. आठवले गटाचे पाश्चिम महाराष्ट्र संघटक डॉ संपतराव कांबळे तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, तालुका कार्याध्यक्ष सुशांत कांबळे, मा वसंतराव चव्हाण, अनिल शिंदे, चंद्रकांत चव्हाण, अशोक चव्हाण आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

ओला दुष्काळ जाहीर करा !
शेतकऱ्यांची भव्य मोर्चाने शासनाकडे मागणी ..
जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा –
या मागणीसाठी राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मोर्चा…
डॉ . पल्लवी पवार हिचा यथोचित सन्मान .
बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण
कल्याणराव दळे ; मेढा येथे नाभिक महामंडळाची बैठक
गवडी गावचे सुपुत्र कुमार मयूर पवार यास महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर…..
भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
सरकार व पुरातत्व विभागाला शिवमंदिर बांधता येत नसेल तर मला मंदिर बांधण्याची परवानगी द्या — कुमुदिनी चव्हाण
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ओझरे शाळेस भेट…
बावधन बगाड मानकरी-अजित बळवंत ननावरे
अंकुश बेलोशे यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती
Scroll To Top