Skip to content

महायुतीच्या विजयाची जबाबदारी भाजप घेणार .. बावनकुळे … साताऱ्यासह ४५ जागा निवडुन आणणार .. पालकमंत्री बदल ठरल्याप्रमाणेच ..

IMG-20231004-WA0361

News By - Narayan Jadhav

*महायुतीच्या विजयाची जबाबदारी भाजप घेणार: बावनकुळे*
*सातार्‍यासह ४५ जागा निवडून आणणार, पालकमंत्री बदल ठरल्याप्रमाणेच*
*सहयाद्री न्युज स्टार ११*
सातारा / प्रतिनिधी . महायुतीच्या प्रत्येक घटकाला उमेदवारी सांगण्याचा अधिकार परंतु, कोणाला कोणती जागा मिळेल हा अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार ठरवतील. जागा कोणालाही मिळो, भाजप आपली ताकद लावेल आणि ४५ जागा निवडून आणणार, पूर्ण ताकद लावणार भाजप मोठा भाऊ म्हणून महायुतीच्या विजयाची जबाबदारी भाजप घेणार असून सातारा लोकसभा महायुतीचीच निवडून येणार, असल्याचा ठाम दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
पालकमंत्रीपद ठरल्याप्रमाणेच
पालकमंत्री बदलाबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे, जे ठरलं होतं तेच झालं आहे. नवीन पालकमंत्री मिळाल्यामुळे अधिक परफॉर्मन्स आणि वेगवेगळ्या योजना योजना यामधून चालना मिळणार आहे. अशी अशी प्रतिक्रिया पालकमंत्री बदलावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. आज नव्याने ११ जिल्ह्याच्या पालकमंत्री निवडीबाबत श्री. बावनकुळे म्हणाले, पालकमंत्री जादा मिळाल्याने जिल्ह्यांना विकासकामात न्याय मिळेल. अजित पवार कधीही नाराज नव्हते, ते कधीही नाराज होत नसतात. या निवडीत राजकीय रंग आणू नये. एका व्यक्तीवर ४ जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती, आता प्रत्येकाला वेगळी जबाबदारी मिळाल्याने विकास कामे गतीने होतील.
बच्चू कडूंच्या नाराजीवर ते आमचे चांगले मित्र आहेत भाजपचा त्रास त्यांना होणार नाही असं सांगताना घटक पक्षांना जेवढं मोठ स्थान आमच्याकडे आहे तेवढं कुणाकडेच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तर जनगणनेचा अधिकार केंद्र सरकारचा. राज्यांनी डेटा तयार करावा हा राज्याचा अधिकार असल्याचे सांगितले.
सातारा लोकसभा प्रचंड मतांनी जिंकणे हे ध्येय. ६०० घरी ६०० वॉरियर जाणार आहेत. संपर्क ते समर्थन. पुढच्या दोन महिन्यात साडेतीन लाख घरी मोदी सरकारच्या सर्व योजना पोचवण्याचे काम करणार असल्याचे सांगत ४५जागा जिंकणार असल्याचा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

ओला दुष्काळ जाहीर करा !
शेतकऱ्यांची भव्य मोर्चाने शासनाकडे मागणी ..
जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा –
या मागणीसाठी राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मोर्चा…
डॉ . पल्लवी पवार हिचा यथोचित सन्मान .
बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण
कल्याणराव दळे ; मेढा येथे नाभिक महामंडळाची बैठक
गवडी गावचे सुपुत्र कुमार मयूर पवार यास महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर…..
भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
सरकार व पुरातत्व विभागाला शिवमंदिर बांधता येत नसेल तर मला मंदिर बांधण्याची परवानगी द्या — कुमुदिनी चव्हाण
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ओझरे शाळेस भेट…
बावधन बगाड मानकरी-अजित बळवंत ननावरे
अंकुश बेलोशे यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती
Scroll To Top