Skip to content

केळघरचे सुपुत्र युवा उद्योजक समाजसेवक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ) उत्कृष्ठ समाजसेवक पुरस्काराने सन्मानित ..

Screenshot_2023-09-29-23-18-35-37_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

News By - Narayan Jadhav

केळघरचे सुपुत्र युवा उद्योजक समाजसेवक राजेंद्र धनावडे ( भाऊ ) उत्कृष्ट समाजसेवक पुरस्काराने सन्मानित ..
*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव ..
केळघर ता . जावली गावचे सुपुत्र युवा उद्योजक , समाजसेवक श्री राजेंद्र लक्ष्मण धनावडे (भाऊ) यांना सर्वोदय क्रांती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व सरपंच ग्रामपंचात चोरांबे यांचे वतीने ‘उत्कृष्ठ समाजसेवक ‘ पुरस्कार जावलीचे मा . आ . सदाशिव सपकाळ व सरपंच विजय सपकाळ यांचेसह प्रमुख मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला .
चोरांबे ता .जावली येथे गणेशोत्सवानिमित्त सरपंच ग्रामपंचायत चोरांबे , सर्वोदय क्रांती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चोरांबे यांचे वतीने माजी आमदार सदाशिव सपकाळ सरपंच विजय सपकाळ यांचे हस्ते व सपोनि संतोष तासगांवकर , व्यसनमुक्त अध्यक्ष विलासबाबा जवळ , ओंकार पवार यांचेसह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला .
समाजसेवक व उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ ) केळघर विभागात निस्वार्थी सरळ हाताने गोरगरीब जनतेला शालेय विद्यार्थी प्रशासनासह सामाजीक उपक्रमांना स्वखर्चातुन मदत करणारे व्यक्तीमहत्व असुन केळघर व परिसरात स्वखर्चाने वनराई बंधारे बांधुन या परिसरातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले असुन भैरवनाथ विद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भरीव मदत केली असुन या विभागातील व मुंबईस्थित युवक खेळाडुंना विशेष मदत करून प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे .
येथील ५४ गावांची प्रमुख मागणी असलेल्या बोंडारवाडी धरण होण्यासाठी बोंडारवाडी धरण कृती समितीच्या माध्यमातुन विविध कार्यक्रम राबवुन या विभागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा व आपला भाग सुजलाम सुफलाम व्हावा हा एकच ध्यास घेतला असुन ते बोंडारवाडी धरण कृती समितीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत .
श्री राजेंद्र धनावडे (भाऊ) यांना उत्कृष्ठ समाजसेक पुरस्कार मिळाल्याने त्यांचे विविध स्थरातुन अभिनंदन होत आहे . व राजेंद्र धनावडे (भाऊ) मित्र समुहाच्या वतीने सरपंच ग्रामपंचायत चोरांबे व सर्वोदय क्रांती गणेशोत्सव मंडळाचे आभार मानण्यात आले.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

ओला दुष्काळ जाहीर करा !
शेतकऱ्यांची भव्य मोर्चाने शासनाकडे मागणी ..
जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा –
या मागणीसाठी राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मोर्चा…
डॉ . पल्लवी पवार हिचा यथोचित सन्मान .
बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण
कल्याणराव दळे ; मेढा येथे नाभिक महामंडळाची बैठक
गवडी गावचे सुपुत्र कुमार मयूर पवार यास महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर…..
भीम शाही युवाक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
सरकार व पुरातत्व विभागाला शिवमंदिर बांधता येत नसेल तर मला मंदिर बांधण्याची परवानगी द्या — कुमुदिनी चव्हाण
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ओझरे शाळेस भेट…
बावधन बगाड मानकरी-अजित बळवंत ननावरे
अंकुश बेलोशे यांची मंडल उपाध्यक्ष पदी नियुक्ती
Scroll To Top