तंटामुक्ती मधील प्रकरणे सामंजस्याने सोडवणार .. सुनिल कदम ..

News By - Narayan Jadhav
*तंटामुक्ती मधील प्रकरणे सामंजस्याने सोडवणार -सुनील कदम*
*सहयाद्री न्युज स्टार ११*
बावधन / दिलिप कांबळे .
आपल्या गावाला विचारांचा वारसा लाभला आहे ग्रामस्थ एकोप्याने राहण्याचा प्रयत्न करतात तंटामुक्ती कडे आलेली प्रकरणे सामंजस्याने सोडवणार असल्याचे मत बावधन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील तात्या कदम यांनी व्यक्त केले महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती बावधनच्या 2023 निवडीतील अध्यक्ष व सदस्यांचा सत्कार स्वागत समारंभ ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केला असता तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील कदम बोलत होते ते पुढे म्हणाले कैलास वाशी वसंतराव पिसाळ यांनी आम्हा कार्यकर्ते यांना लाख मोलाची शिकवण दिली त्यांच्या विचाराने कार्य करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहील यावेळी सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत दादा पिसाळ पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे उपसरपंच उदयसिंह पिसाळ विक्रम तात्या पाटील विवेक भोसले पत्रकार दिलीप कांबळे राजेंद्र काका भोसले दिग्विजय ठोंबरे यांची भाषणे झाली राजेंद्र चव्हाण यांनी कै वसंतराव पिसाळ यांना शब्द सुमनांनी श्रद्धांजली वाहिली प्रास्ताविक प्रशांत पिसाळ यांनी केले आभार प्रणित पिसाळ पाटील यांनी मानले कार्यक्रमास किसनवीर कारखान्याचे माजी संचालक सयाजी बापू पिसाळ वहिवाटदार चंद्रकांत भोसले भैरवनाथ ट्रस्टचे अजित पिसाळ विश्वास पिसाळ वकील अर्जुन ननावरे दत्तात्रय रासकर विनायक तांबे पोलीस पाटील अश्विनी हावरे सचिन भोसले माजी सरपंच नारायण पिसाळ व तंटामुक्त समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.










